Marathi Biodata Maker

शेतकरी संपाला नाना पाटेकरांचा पाठिंबा

बुधवार, 7 जून 2017 (16:25 IST)

शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असं मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शेतकरी संपाचा फुटबॉल करू नका असे वास्तववादी वक्तव्य मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी नाम फाऊंडेशननं शेतकरी आणि शेतकरी संपाबाबत आपली भूमिका मांडली आहे. स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसंच ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. यावेळी  नाम फाऊंडेशनने आत्तापर्यंत केलेले काम मकरंद अनासपुरे यांनी माहिती दिली. तसेच आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याचं जगणं सुसह्य व्हावं ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असं अनासपुरे यांनी म्हटलं आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर विविध क्षेत्रातल्या लोकांनी, प्रसिद्ध आणि सधन व्यक्तींनी एकत्र येऊन शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे असंही पाटेकर यांनी म्हटलंय. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

गडचिरोलीला 'ग्रीन स्टील हब' बनवण्यासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे सहा लोहखनिज खाणींची मागणी केली- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई हवामान बातमी: उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक वर्सोवा बीचवर झोपले , पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला

LIVE: गोंदियामध्ये आरटीओ कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर

तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात का? 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' चे नवीन नियम पहा!

गोंदियामध्ये आरटीओ कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर, वाहतूक सेवेवर परिणाम

पुढील लेख
Show comments