शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (15:03 IST)

नाना पाटेकरांचे भाषण व्हायरल

nana patekar
कोल्हापूरच्या कागल शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे ,ज्योतिबाफुले आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ अभिनेता नानापाटेकर यांच्यासमवेत उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते नानापाटेकर,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची चांगलीच मैत्री आहे.

कोल्हापूरच्या कागल येथे पुतळ्यांच्या अनावरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते नानापाटेकर यांनी दिलेलं भाषण चांगलंच व्हायरल होत आहे. या भाषणात नानांनी आपल्या मित्रांचं म्हणजे अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं खूप कौतुक केलं. अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यांची आठवण काढून नाना म्हणाले की ''अजित आता खूप बदलला आहे. तो काहीही बोलताना खूप विचारकरून बोलतो. बोलताना प्रत्येक शब्द जपून बोलतो. समोरच्याला कसं सरळ करायचं, हे त्यांना चांगलंच माहित आहे. पूर्वीचे अजितदादा आणि आत्ताचे अजितदादा यांच्यात बराच बदल झाला आहे. असं नाना म्हणाले आणि मग हसन मुश्रीफ यांच्या नावाचा उल्लेख मर्फीबॉय चे गोंडस बॉय म्हणून केला. त्यांनी मुश्रीफ यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की मुश्रीफ तुम्ही चित्रपट काम करा मी तुमच्या कागल मधून निवडणूक लढतो. कोल्हापुरात पुतळ्यांचे अनावरण झाले नसून ते विचारांचे अनावरण झाले आहे. असं ते म्हणाले.