गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2024 (16:16 IST)

नाना पटोले यांनी महायुती सरकारच्या विजयावर टीकास्त्र सोडले

Nana Patole
Nana Patole News:महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या नावावर देवेंद्र फडणवीसांचे नाव शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथ विधी सोहळा होणार असून  त्याची तयारी सुरु झाली आहे .देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपवण्यात आल्याने जनतेत उत्साह आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीच्या शपथविधी सोहळ्यावर टीका केली आहे.
 
सध्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती विजयी झाल्यांनतर देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या नावाची घोषणा करायला बरेच दिवस लागले. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही महाआघाडीवर सरकार स्थापन न झाल्याबद्दल विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
आता एकनाथ शिंदे  यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानन्तर महाराष्ट्राच्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. 

शिंदे या निर्णयाने नाराज आहे. यावर नाना पाटोले यांनी महायुतीच्या विजयावर टीका केली आहे. ते म्हणाले, मी पहिल्याच दिवशी म्हटले होते की अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्ष म्हणजे काय हे चांगलेच कळेल. आता त्याची सुरुवात देखील झाली आहे. भाजपला जनतेची काहीच पर्वा नाही. मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर काढून टाकण्यात आल्याचा पहिला मुद्दा आम्ही उपस्थित केला होता.

मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेसाठी विहित फॉर्म आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे.आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली असून ते काय निर्णय घेतात ते पाहू.आमचा दुसरा मुद्दा मतदार यादीत नवीन नावांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पाच महिन्यांत सुमारे 47 लाख मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली 
Edited By - Priya Dixit