1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:13 IST)

भाजपाच्या ४० पैसेवाल्या आयटीसेलवाल्यांकडून हा अपप्रचार-नाना पटोले

nana patole
एका विदर्भातील सभेदरम्यान राहुल गांधींचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. त्यावेळी, राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती नाकारल्याचा प्रचार भाजपा समर्थकांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. आता, त्यास अप्रचार म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.
 
धुळ्यातील सभेदरम्यान राहुल गांधींचा तिरंगी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यावेळी, अनेकांनी राहुल गांधींना विविध भेटवस्तू देत सन्मान केला. दरम्यान, एका व्यक्तीने त्यांन विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला असता, तेथील काहींनी संबंधित व्यक्तीस हटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, भाजपा समर्थकांनी अर्धवट व्हिडिओ शेअर करत राहुल गांधीबद्दल अपप्रचार केल्याचं नाना पटोले यांनी संपूर्ण व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. पटोले यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत, भाजपाच्या ४० पैसेवाल्या आयटीसेलवाल्यांकडून हा अपप्रचार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

Edited By - Ratnadeep Ranshoor