1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (08:54 IST)

नांदेड : मनोरुग्ण मुलाने केली स्वतःच्या आईची हत्या..

murder
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील नायगाव  तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या मुलाने स्वतःच्या आईची खलबत्याने ठेचून हत्या केली आहे. गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाडा (वय ४४) असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे. आरोपी मुलगा हा मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर हत्या झालेल्या महिलेच्या पतीने फिर्याद दिल्यानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त होत आहे.
 
याबाबत सविस्तर..
ही धक्कादायक घटना शनिवार (२३ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. बरबडा गावात एका महिलेचे दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना पोलिसांना समजली होती. त्यानंतर अधिक तपास केला असता जन्मदात्या मनोरुग्ण मुलाने या आईची हत्या केली आहे. मुलगा व आई मध्ये वाद झाला होता. वादाच्या भरात मुलाने आईचा खून केला आहे.

गोदावरी लिंगोबा वटपलवाड ही महिला पती आणि दोन मुलांसह बरबडा येथील पेठगल्लीत राहत होती. शनिवारी गोदावरीबाई आणि त्यांचा मनोरुग्ण मुलगा श्रीनिवास वटपलवाड हे दोघेच घरी होते. त्यानंतर लिंगोबा वटपलवाड हे घरी आल्यानंतर त्यांना गोदावरीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
 
मृतदेहाच्या शेजारीच रक्ताने माखलेला खलबत्ता होता. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर आणि अधिक चौकशी केल्यावर मनोरुग्ण असलेल्या मयत महिलेचा मुलगा श्रीनिवासवर त्यांचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor