मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नारायण राणेंनी केली भाजपची स्तुति

Narayan Rane praise BJP
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.  यावेळी  नारायण राणेंनी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. इतकंच नाही तर नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचंही तोंडभरुन कौतुक केलं.

विशेष म्हणजे नारायण राणे यांनी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं. नेहमी एकमेकांवर टीका करत चेहराही न पाहणारे विरोधक एकमेकांचं स्वागत करत असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.