शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:52 IST)

Nashik :स्विमिंग पूलमध्ये पोहताना तरुणाला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू

नाशिकच्या मालेगावातून धक्कादायक बातमी आहे. स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका 19 वर्षाच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी घडली आहे.जयेश भरत भावसार असे या मयत तरुणाचे नावं आहे. मयत जयेश हा शिवाजी नगर परिसरात असलेल्या अस्पायर क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये  रविवारी नेहमीप्रमाणे मित्रांसोबत पोहोण्यासाठी आला होता.  पोहता पोहता तो स्विमिंग पुलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला आणि त्याला अस्वस्थता जाणवू लागली. काही वेळ पाण्यातच पडला होता. मित्राने त्याला त्याची अवस्थापाहून त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले , त्यापूर्वी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.   ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.