Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (16:47 IST)
पुन्हा पाच मोबाईल सापडले
नाशिक मध्यवर्ती कारागृह आहे की कॉल सेंटर असा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकशी समिती ने घेतलेल्या शोध मोहिमेत आज पुन्हा पाच मोबाईल आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण ३४ मोबाईल सापडले आहेत. आय अगोदर २३ डिसेंबर रोजी ४ तुरुंग अधिकारी निलंबन कारवाई केली होती. मात्र अजूनही मोबाईल सापडत असल्याने खोलवर चौकशी करण्याची गरज आहे. काल कारागृहात ९ मोबाईल सापडले होते. गेल्या आठ दिवसात कैद्यांकडे एकूण ३४ बेकायदेशीर मोबाईल सापडले आहेत.त्यानंतरही मोबाईल सापडण्याचे सत्र सुरूच असल्याने या प्रकारात कारागृहातल आणखी काही कर्मचारी व अधिकारी गुंतले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.