शुक्रवार, 23 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:09 IST)

नाशिककरांनी मनसेला झिडकारले

nashikakarancha manasela tata
नाशिकमध्ये विकास कामे केल्याचा दावा करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी सपशेल झिडकारले आहे. 122 सदस्यांच्या नाशिक महापालिकेत मनसेचा अवघा एक उमेदवार आघाडीवर आहे. भाजपा सर्वाधिक 18, शिवसेना 7 काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. 
 
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी मनसेने रस्ते, बॉटनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक, डंम्पिग ग्राऊंडवर खत प्रकल्प अशी विकासकामे दाखवून मुंबई, पुणे आणि ठाण्यामध्ये मते मागितली होती. पण जिथे ही विकासकामे झाली त्या नाशिककरांनाच हा दावा पटलेला नाही. राज यांनी ठाणे, मुंबई आणि पुणे येथील जाहीरसभेमध्ये नाशिकमधल्या विकासकामांचे प्रेझेंटेशन केले होते. विरोधकांनाही त्यांचा हा दावा खोडून काढता आला नव्हता. पण प्रत्यक्षात मतदारांनीच मतपेटीतून मनसेला बाद केले आहे. नाशिकमध्ये 60 टक्के मतदान झाले होते.   लोकसभा, विधानसभेमध्ये घसरलेले मनसेचे रेल्व इंजिन महापालिका निवडणुकीतही रुळावर येऊ शकलेले नाही.