शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (11:43 IST)

नाशिकच्या सुपुत्राचा लडाखमध्ये मृत्यू

भारतीय सैन्यदलातील नाशिकच्या नांदगावच्या मांडवड गावातील सुपुत्र संदीप भाऊसाहेब मोहिते(33) यांना लडाखमध्ये कर्तव्यदक्ष असताना अपघातात वीरमरण आले. 

भारतीय लष्करातील लेह येथे 105 इंजिनिअर रेजिमेंटचे जवान 2009 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले त्यांनी आपले प्रशिक्षण पुण्यात पूर्ण केले. त्यांनी सैन्य दलात विविधठिकाणी आपले कर्तव्य बजावले. लडाख मध्ये संदीप भाऊसाहेब मोहिते यांचा अपघाती मृत्यू झाला.अशी माहिती प्रशासनाच्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. 
संदीप यांचा लेह लडाखला कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात 
 त्यांची पत्नी, दोन लहान मुले, आई वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.त्यांचा लहान भाऊ श्रीकांत हा भारतीय लष्करात जयपूर येथे कर्तव्य बजावत आहे.  संदीप जानेवारीत सुट्टीवर गावात आले होते आणि ते सुट्टीवरून 1 फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर रुजू झाले असून बर्फ हटवण्याचे काम करताना त्यांचा अपघात झाला.  त्यांना तातडीनं मिलिटरी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. 
त्यांच्या निधनाने मांडवड नांदगाव येथे शोककळा पसरली आहे
 
Edited by - Priya Dixit