बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (14:00 IST)

नाशिकच्या प्रेसमधून 5 दशलक्ष नोटा रवाना

नाशिकच्या प्रेसमधून 5 दशलक्ष नोटा रवाना
नाशिकमध्ये असलेल्या चलार्थ मुद्रणालयातून पाचशे रुपयांच्या नवीन सुमारे पाच दशलक्ष नोटा रवाना झाल्याचे समजेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने प्रशासनाने प्रेसला नवीन नोटा छपाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रेसमध्ये नवीन डिझाइन व रंगातील पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेली आहे.

दरम्यान, सुमारे पाचशे दशलक्ष नोटा छपाईचे उद्दिष्ट प्रेसला देण्यात आले असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाचशे रुपयांच्या पाच दशलक्ष नोटा रेल्वेने रवाना करण्यात आल्या आहेत. नवीन नोटा छापण्याचे काम सुरु असून वेळेत उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असे  कामगारांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.