रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:35 IST)

मुंडे यांना एसीबीने क्लीनचिट देण्याची बातमी ऐकली. यात काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नाही -मलिक

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे  यांना चिक्की घोटाळ्याप्रकरणी एसीबीने क्लीनचिट देण्याची बातमी ऐकली. यात काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नाही. मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांचे संरक्षण कसे करतात याचे हे उदाहरण आहे. राज्यातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुख्यमंत्री सुरुवातीपासूनच सर्वांना क्लीनचिट देत आले आहेत. पंकजा मुंडे यांच्या प्रकरणातही विरोधकांनी Anti-Corruption Bureau Maharashtra कडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर एसीबीने महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांचा अहवाल मागितला होता. प्रधान सचिवांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे पंकजा मुंडे यांना एसीबीने क्लीनचिट दिली आहे. या प्रकरणात एसीबीने कोणतीही चौकशी केली नसल्याचे स्पष्ट दिसून येते. मुख्यमंत्री आपल्या भ्रष्ट मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे यातून दिसून येते. एसीबीने क्लीनचिट दिली असली तरी हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. विरोधक या नात्याने आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा कोर्टात करू तसेच या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याचे कामही करू असे मत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आयांनी व्यक्त केले आहे.