1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (21:00 IST)

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर…..

नवाब मलिक यांच्याबाबत एक सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलं आहे. तब्बल दीड वर्षांनी ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. पण वैद्यकीय कारणास्तव  2 महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या सात महिन्यांपासून अटकेत असलेले नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन त्यांना महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लाँर्डिंग प्रकरण तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
 
याच प्रकरणात ईडीने नबाव मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. गेल्या सात महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे ईडीने म्हणले आहे.
 
महाविकास आघाडीचे सरकार असताना फेब्रूवारी2022 मध्ये नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अजित पवार गटाच्या बंडानंतर नवाब मलिक यांच्या सुटकेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे.
 
नवाब मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात दिल्लेया माहितीनुसार नवाव मलिक यांना किडनीचा विकार आहे. नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे, त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं वकिलांनी म्हटल होतं. मलिक यांची सध्या एकच किडनी कार्यरत आहे. मलिकांवर सध्या कुर्ला इथल्या क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात दाखल करायचं असल्याने त्यांच्या जामीनाची मागणी करण्यात आली होती.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor