1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (17:20 IST)

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण, डेथ वॉरंट जारी, २० मार्चला फाशी

maharashtra news
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चार दोषींना २० मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. २० मार्चला पहाटे ५.३० वाजता दोषींना फासावर लकटवणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. याआधी ३ मार्च रोजी या दोषींना फाशी दिली जाणार होती. मात्र ती तारीख टळली. आरोपी पवन कुमारची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ही तारीख टळली होती. डेथ वॉरंटसाठी पुढची तारीख मिळेपर्यंत या चारही दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती. आता  या आरोपींच्या फाशीसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे.