रविवार, 23 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (12:22 IST)

वाशीम मध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या

Newlyweds killed for dowry in Washim
देशात हुंडा घेणं आणि देणं हे कायद्यानुसार गुन्हा असून देखील आज देखील काही भागात हुंडा देण्याची व घेण्याची प्रथा आहे. या हुंड्यामुळे कितीतरी मुली हुंड्याला बळी पडतात. अशीच घटना वाशिम येथे घडली आहे. 
वाशिमच्या वाघजाळी परिसरात हुंड्यासाठी एका नवविवाहितेचा बळी गेला आहे. मेघा शिंदे असे या मयत महिलेचे नाव आहे. या महिलेची गळा चिरून हत्या कऱण्यात आली आहे.

मेघाचा विवाह काही महिन्यांपूर्वी वाघजाळीचे राहणारे गजानन शिंदे यांच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी माहेरहून पैसे आणण्याची मागणी सुरु केली.या साठी तिचा शारीरिक व मानसिक छळ  केला जात होता.

मागणीनुसार, मेघाच्या सासरच्या लोकांना चेक द्वारे पैसे दिले. मात्र अजून पैसे आण अशीमागणी केली जात असताना काल धारदार शस्त्राने मेघाचा गळा चिरून खून करण्यात आला.तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा या पूर्वीच मृत्यू झाला. 

पोलिसांनी प्रकरणाची नोंद करत दोघांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात तिच्या पतीने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.   
 
 Edited by - Priya Dixit