शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (22:05 IST)

राज्यात पुन्हा लागणार संचारबंदी, काळजीची गरज

केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केली असून अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. 
 
केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 
 
केरळमध्ये ओनम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्राकडून काही उपाययोजनाही सूचवण्यात आलेल्या आहेत. राजेश टोपे म्हणाले, आगामी काळात राज्यातील सणवार पाहता या बाबत आपल्याला काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी ही नक्की होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतील. 
 
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण अजिबातच नाहीत तिथे शाळा सुरू होऊ शकतात का याची चाचपणी आम्ही करतोय. 5 तारखेपर्यंत राज्यातील सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.