नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका
कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य आयुक्तांविरोधातील मासेफेक आंदोलनप्रकरणी नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना कुडाळ सत्र न्यायालयात नितेश राणेंना हजर करण्यात आले. यावेळी नितेश राणे यांच्यासह 24 जणांची प्रत्येकी सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
येथील मच्छिमारांच्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य कार्यालयात गेले होते. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली. तसेच, नितेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते. दरम्यान, याप्रकरणी मालवण पोलिसांनी नितेश राणे यांच्यावर ही कारवाई केली होती.