रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (12:43 IST)

मुंबईत युती करावीच लागेल : नितीन गडकरी

भाजप आणि शिवसेनेला गेले गेले विसरून एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही, असे मत केंद्रीय मंत्री आरि भाजप नेते नितीन गडकरी  यांनी म्हटले आहे. एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यानी मुंबईतील
युतीबाबतचे सूतोवाच केले. ते म्हणाले की, शिवसेनेसोबत झालेली भाजपची पुती ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर झाली आहे. त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत आणि निवडणुकीच्या काळात मतभेद झाले गेले विसरून मुंबईत शिवसेना आणि भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि माजपला मिळालेल्या जागांमध्ये फक्त दोन जागांचा फरक आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर कोणाचा बसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सत्तास्थापण्यासाठी युतीसाठी कोण पुढाकार घेणार? दोन्ही पक्षांकडून अपक्षांना आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्तेची गणिते कोण जुळवणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. महापौराच्या वादाबाबत बोलताना गडकरी यांनी प्रत्येकालाच आपल्या पक्षाचा महापौर असावा, असे वाटते. मात्र, फडणवीस आणि उद्धव दोघेही प्रगल्भ नेते आहेत. ते योग्य निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.