1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 (17:08 IST)

सांगली येथील शहीद नितीन कोळी यांच्यावर सांगलीतील दुधगावमध्ये अंत्यसंस्कार

nitin koli shahid
सांगली येथील शहीद नितीन कोळी यांच्यावर सांगलीतील दुधगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत . त्यांचा मुलगा देवराज आणि भाऊ उल्हास यांनी नितीन यांना मुखाग्नी दिला आहे. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. 

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नितीन कोळी शहीद झाले. कोळी हे श्रीनगरच्या लष्करी तळावर लष्कराने त्यांना अंतिम सलामी दिली . त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांचं मूळगाव असलेल्या सांगलीतील दुधगावमध्ये आणण्यात आलं होते. यांच्या अंत्यदर्शनासाठी अवघी खूप मोठी गर्दी जमली होती. *‘*शहीद नितीन कोळी अमर रहे*, *पाकिस्तान मुर्दाबाद*‘*च्या घोषणा दिल्या जात होत्या.