बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:18 IST)

पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”

raj thackery
सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट म्हणता येणार नाही असा टोला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, देशातील जातील आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमिविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिज ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही.

महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र भारतीय जनता पक्षाचा  छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत व केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मुक दर्शक बनून पाहत आहे. चांगल्या राज्यकर्त्याचे हे लक्षण नाही.

ब्रिटिशांनी फोडा, झोडा व राज्य करा या नितीचा अवलंब केला. देशी राज्यकर्त्यांनी राज्य करण्यासाठी त्याच नितीचा अवलंब करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वाया गेली. दुसरे काय म्हणायचे ! असा टोला राज ठाकरे यांना लागण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट होते. पण ते धर्मांध नव्हते. एकदा त्यांनी स्पष्टचं सांगीतले होते. मला हिंदुंना जागे करायचे आहे. पण मला हिंदुंचा खोमेनी व्हायचे नाही. बाळासाहेंबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदुंचे ओवेसी व्हायची घाई झाली आहे.

ही ईतकी घाई बरी नाही हे त्यांनी सांगयचे कोणी ? महाराष्ट्रात दोन ओवीसी एकत्र येऊन भाजपचा छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत. केंद्रसरकार मात्र हे मुकपणे पाहत आहे. चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही. हिंदूंचे ओवेसी म्हणत राज ठाकरेंना नकळत टोला लगावला आहे.

ब्रिटीशांनी फोडा आणि राज्य करा याचं नितीचा अवलंब केला होता. देशी राज्यकर्त्यांना राज्य करायला याचं नितीचा अवलंब करावा लागत असेल तर, स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायच गेली. दुसरे काय म्हणायचे! देशात 2024 च्या निवडणूकांची तयारी भाजपने सुरू केली आहे.

तयारी म्हणजे काय ? तर देशाचे वातावरण साफ बिघडवून टाकायचे. काँग्रेस राजवटीत दंगली होत होत्या असा ठपका भाजप ठेवायचे. पण आता राम नवमी आणि हणुमान जंयतीला दंगली होत आहेत त्याचे काय? असा टोला सामनातून भाजपला लगावला आहे.