शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (08:59 IST)

निवडणुकीत आता साईबाबा : धक्कादायक प्रकार उघड

शिर्डी विधानसभा मतदार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन अँपचा गैरवापर करून यादीत साईबाबांचे नाव घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हा सर्व प्रकार २०१८ च्यावर्षीच्या सुरुवातीला घडली आहे. प्रकरणी नायब तहसिलदार सचिन म्हस्के यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब) (क) नुसार अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी 2018 रोजी शिर्डी विधानसभा मतदार संघ यादीत ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करून शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर 6 भरला होता. यासाठी पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता. छाणणी करीत असताना हा प्रकार निवडणूक आधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच वेळी राहाता पोलिसांना या बाबत कळविले होते. सदर गुन्हा सायबर क्राईम असल्याने पोलिसांनी नगरला तक्रार करण्यास सांगितले. सायबर सेलकडे गेले असता त्यांनीही तक्रार दाखल करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे सदर गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. अखेर मंगळवारी राहाता पोलिसांनी नायब तहसिलदार म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला.