शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:20 IST)

आता सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप

आता उद्योगमंत्री सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप झालाय. इगतपुरीजवळची एमआयडीसीसाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीपैकी चारशे एकर जमीन सुभाष देसाईंनी एका बिल्डरसाठी डिनोटीफाय केल्याचा आरोप झालाय.

या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या गोंदे दुमालमध्ये ही जमीन आहे. एमआयडीसाठी ही जमीन अधिसूचित करण्यात आली होती. यातली 400 एकर जमीन सुभाष देसाईंनी डीनोटीफाय केली. शिवसेनेजवळच्या एका बिल्डरसाठी जमिनीवरचं नोटीफिकेशन हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणात 3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.