रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (08:34 IST)

ओबीसी आरक्षण : सुधारित अध्यादेशावर राज्यपाल यांची झाली स्वाक्षरी

ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.याआधी राज्य सरकारने अध्यादेश पाठवला होता.
 
मात्र, काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता.यानंतर राज्य सरकारने त्यात आवश्यक ते बदल करून काल रात्री राज्यपालांकडे सुधारित अध्यादेश पाठवला.यावर राज्यपालांनी सही केली आहे.त्यामुळे आगामी महानगरपालिका,नगर पालिका,पंचायत समित्या,नगर पंचायती,जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.