रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (00:45 IST)

नाशिकमध्ये ओमायक्रोन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला!

Omicron maharashtra
कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रोनने नाशकात शिरकाव केला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात (Omicron in Maharashtra) हळूहळू वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नाशकात देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.
नाशिकमध्ये  कोरोनाच्या नव्या प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. या रुग्णावर शहरातील रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान जिनोम सिक्वेन्सिंगच्या रँडम तपासणीत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला आहे. मात्र ओमायक्रॉनचा आढळलेला रूग्ण नॉन सिम्प्टमिक असून रुग्णाची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचं पालन करावं असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.