1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (08:27 IST)

या दिवशी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

On this day
शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आली असून.   बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची याचिका दाखल केली होती. त्याचे पत्रक घेऊन भाजपचे नेते यांनी रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यपालांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलवत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारची ३० जूनला परीक्षा होणार असून महाविकास आघाडी सरकारला या अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सकाळी ११ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करणार का याकडेच आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.