शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:14 IST)

'मातोश्री' बंगला उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. 
 
मुख्यमंत्री ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता की 'दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकू'. अशी धमकी 30 ऑगस्टला आली होती नंतर 'वर्षा' बंगला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यामुळे खळबळ उडाली होती.
 
दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन करण्यात आले होते. धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती. 
 
त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील फार्म हाऊसची काही अज्ञातांनी रेकी केली होती. याप्रकरणी मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर रेकी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती.
 
धमकीचे फोन आल्यावर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली.