शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (16:19 IST)

एक लाखाची पैज

राज्यसभा निवडणूक2022 चा निकाल जाहीर झाला असून राज्यात भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून जळगावचे भाजपनेते गिरीश महाजनचे पीए अरविंद देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता राहुल पाटील यांच्यात एक लाख रुपयांची पैज लागली होती.अरविंद देशमुख यांनी या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार येण्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता राहुल पाटील याना चॅलेंज दिलं.आणि ते चॅलेंज राहुल पाटील यांनी स्वीकारलं देखील. 

राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर अरविंद देशमुख हे पैज जिंकले. आणि राहुल पाटील ही पैज हरले. राहुल पाटील हे ठरल्या प्रमाणे पैज हरल्यावर शनिवारी अरविंद देशमुख यांना देण्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश  गिरीश महाजनयांच्या जी.एम. फाउंडेशन या कार्यालयात घेऊन आले. पण अरविंद देशमुख यांनी ते धनादेश घेण्यास नकार देत धनादेश परत दिला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यात लागलेल्या पैजची चांगलीच चर्चा होत आहे.