1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (21:49 IST)

एकच....थरारक ! जेव्हा चालत्या बुलेटने घेतला पेट, अंगावर आला काटा

One .... thrilling! When the walking bullet took the abdomen
नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरात दुपारच्या सुमारास एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने सर्वांचीच धावपळ झाली. मात्र दैव बलत्तर असल्याने प्रसंगावधान पाहून चालकाने स्वतःला वाचविले. हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. वाचा नक्की काय घडले.
 
चालत्या दुचाकीने अचानक रस्त्यात पेट घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी मुंबई नाका परिसरातील दीपाली नगरजवळ घडली. झालं काय, मुंबई आग्रा महामार्गावरून दोघे जण मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या बुलेटने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी सोडून आपला बचाव केला. परिसरातील युवकांनी तत्काळ पाणी टाकून आग विक्सझवण्याचा प्रयत्न केला मात्र बुलेट दुचाकी जळून खाक झाली आहे.
 
घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. सुदैवाने या दुर्घनेत कुणालाही दुखापत झालेली नसून, पेट्रोलच्या टाकीचे झाकण लीक असल्याने पेट्रोल बाहेर येऊन इंजिनच्या संपर्कांत आल्याने ही आग लागल्याचे बुलेटवर स्वाराकडून सांगण्यात आले आहे.