आरटीई प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरुवात

student
Last Modified गुरूवार, 4 मार्च 2021 (07:49 IST)
आरटीई प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरुवात झाली. प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी संकेतस्थळ सुरू होताच त्यावर अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे सुरुवातील संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू राहिल्याने पालकांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. मात्र, थोड्याच वेळात संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्याने पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले. पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यातून तब्बल १० हजार ५६३ विद्यार्थ्यांचे अर्ज भरले. २०२१-२०२२ या वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ३ मार्चला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते.
पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यातून तब्बल १० हजार ५६३ पालकांनी अर्ज केले. यामध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक २९७० पालकांनी अर्ज केले. त्याखालोखाल नागपूर ११५२, नाशिक ११४२, ठाणे ८४९, मुंबई ५९३, रायगड ५४९, औरंगाबादमध्ये ४९१ पालकांनी ऑनलाईन अर्ज केले. आरटीई प्रवेशासाठी राज्यभरामध्ये ९४३१ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा आहेत. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी २१ मार्च पर्यंत https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. आरटीईअंतर्गत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना
देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची ...

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 ...

राज्यात कोरोनाचे 53 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे 24 तासात 864 लोक मृत्युमुखी
शनिवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 53 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य ...

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?

कोरोना संकट भारताच्या मोदी ब्रँडसाठी धक्का का आहे?
अपर्णा अल्लुरी ब्रिटनच्या संडे टाईम्स वृत्तपत्रात नुकतीच एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली ...

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला आवाहन - राज्यांना लसीकरणासाठी ...

उद्धव ठाकरे यांचे केंद्राला आवाहन - राज्यांना लसीकरणासाठी अ‍ॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी
कोरोनाव्हायरस कोविड -19 लसीकरण कार्यक्रमासाठी राज्यांना स्वतःचे अ‍ॅप विकसित करण्याची मुभा ...

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह ...

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही
कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नसल्याचं केंद्र सरकारने ...