भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील लखंडूर तालुक्यात तीव्र उष्णता आणि ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे १०० हून अधिक देशी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे मुरमाडी गावातील एका शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले असून, १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक अंडीदेखील खराब झाली आहे.
तापमानामुळे कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमताही कमी झाली आहे, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून कुक्कुटपालक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, जर उष्णतेची लाट अशीच सुरू राहिली, तर कुक्कुटपालन व्यवसायाला गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी ते प्रशासनाकडे करत आहे.
Edited By- Dhanashri Naik

