बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (16:05 IST)

पकंजा मुंडे 'या' दिवशी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

pankaja munde
विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात आले आहे. त्यामुळे  पंकजा मुंडेंचे समर्थक नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पकंजा मुंडे 21 जूनला पाथर्डीतील मोहटा देवीचे दर्शन घेणार हेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
 
पंकाजा मुंडे 21 नूनला मोहटा देवीचे दर्शन घेणार असून पार्थर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाध साधणार आहेत. यावेळ त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही घेणार भेट घेणार आहेत. मुंडेंना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मुकुंद गर्जेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे त्या कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत.
 
21 जूनच्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘चलोमोहटादेवी’ असे बॅनर सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केली जात आहे. आता त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.