मंगळवार, 11 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (10:24 IST)

वैद्यनाथ बँकेच्या कारवाईने मुंडे भगिनी अडचणीत

वैद्यनाथ बँकेच्या पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयावर आणि बँकेतील कर्मचा-यांच्या घरावर  केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या बँकेच्या व्यवस्थापकासह दोन कर्मचा-यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड येथे वैद्यनाथ बँकेची मुख्य शाखा  आहे. बीडच्या शाखेतून 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी घाटकोपर येथील शाखेत नेल्या होत्या. त्यातील 15 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य अर्बण को-ऑप बँकेच्या शाखेत जमा केले. गुरुवारी रात्री मुंबईच्या टिळकनगरमध्ये 10 कोटी 10 लाखांची रक्कम जप्त केली गेली. बँक व्यवस्थापक आणि इतर दोन जण ही रक्कम कारमधून नेत होते.बीडच्या खासदार प्रितम मुंडे या वैद्यनाथ को. ऑप. बँकेच्या संचालिका आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.