सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2019 (15:09 IST)

पंकजाच काय, अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात : राऊत

पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच कळेल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत. 
 
राज्यात आता आमचं सरकार विराजमान झालं आहे, असं सांगताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले. तसेच बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशा शब्दांत त्यांनी या प्रकल्पाला स्थगितीच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा दिला. तसेच नाणारबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री विचार करतील, असेही राऊत म्हणाले. भाजपा खासदार अनंत हेगडे यांच्या दाव्यावर फडणवीस नाही तर मुख्य सचिव खुलासा करतील, असेही त्यांनी सांगितले.