सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 (17:42 IST)

सांगलीतील या गावात लोकांची ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने निवडणुका करण्याची मागणी

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे गावात लोकांना ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी गावातील ग्राम पंचायतने ठराव मंजूर केला आहे. बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की, भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावात. जेणे करुन संविधान आणि लोकशाहीला चालना मिळेल.
आणि राज्यघटनेचे रक्षण आणि लोकशाही बळकट करण्याच्या उद्देश्याने हे पाउल घेतले आहे. 
बहे गाव हे पश्चिम महाराष्ट्रातील दूसरे गांव आहे. ज्याने ईव्हीएम बदलून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. 
या पूर्वी डिसेंबरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड(दक्षिण) विधानसभा मतदारसंघातील कोळेवाडी गावातील ग्रामसभेने असाच ठराव केला होता. 

बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की  भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपर मधून घ्यावात. आम्ही इतर गावांना आणि त्यांच्या ग्रामपंचायतींना देखील असे ठराव संमत करण्याचे आवाहन करतो. जेणेकरून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण होउ शकेल.गावातील लोकांनी हा प्रस्ताव तहसीलदाराकडे सादर केला आहे. 
  Edited By - Priya Dixit