सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (09:42 IST)

तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं- प्रवीण दरेकर

pravin darekar
शिवसेनेतील ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा भाजपावर टीका केली.
 
भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत जहाल भाषेत टीका केल्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या कार्यक्रमा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला तुमचा पक्ष आहे की चोरबाजार असा प्रश्न विचारला होता.
 
 
"इतक्या खालच्या दर्जाची टीका मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीवर करणे चुकीचं आहे. शिंदे आताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना काम करू द्या. दोन महिने झाले नाहीत तर एवढा पोटशूळ उठण्याचं कारण नाही. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेने पाहिलं आहे." अशा शब्दांमध्ये दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.