छत्रपती संभाजीनगर : वाहन थांबवण्यावरून वाद; चालकाला मारहाण करून गुप्तांग कापले
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्त्यावर वाहन थांबवण्यावरून झालेल्या वादाने एक भीषण वळण घेतले. गंगापूर-लासूर रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी ३२ वर्षीय मिनी पिकअप चालकाला निर्घृणपणे मारहाण केली आणि नंतर त्याचे गुप्तांग कापले. पोलिसांनी सोमवारी या खळबळजनक घटनेची माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री शिंदेवाडी गावाजवळ घडली. पीडित व्यक्ती एका मित्रासोबत मिनी पिकअप व्हॅनमधून माल पोहोचवून परत येत होता. गंगापूर-लासूर रस्त्यावरील एका वळणाजवळ वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला रस्त्याच्या मधोमध थांबावे लागले.
त्याच क्षणी, एक व्हॅन जवळून गेली आणि पिकअपला धडकण्यापासून थोडक्यात वाचली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की व्हॅनमधल्या सहा ते सात जणांनी पिकअप चालकावर हल्ला केला. आपला जीव वाचवण्यासाठी पीडित व्यक्ती जवळच्या शेताकडे धावला, पण आरोपींनी त्याला घेरले. हल्लेखोरांनी आधी त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर एका धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले. पीडित व्यक्तीला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले. पीडित व्यक्तीला उपचारासाठी गंगापूर उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
Edited By- Dhanashri Naik