स्मार्ट सिटीसाठी राज्यातून पिंपरी चिंचवडची निवड
स्मार्ट सिटीच्या तिसर्या यादीमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये एकूण 30 शहरांची नावे जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शहर नागरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटींची तिसरी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड या महाराष्ट्रातील एकमेव शहराचा समावेश करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशभरातील ३० शहरांची तिसरी यादी जाहीर केली. 'स्मार्ट सिटी' अंतर्गत आता देशभरातील एकूण ९० शहरांचा कायापालट होणार आहे. स्मार्ट शहरांच्या योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील यादीत ३० शहरांची निवड करण्यात आली आहे. यादीत पिंपरी – चिंचवड १८ व्या स्थानी आहे.