शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 7 मे 2021 (08:11 IST)

क्रिकेट खेळणे तरुणाच्या जीवावर उठले; टेरेसवरून पडून मृत्यू

श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील साई सुपर मार्केट कॉम्प्लेक्स गच्चीवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
 
या घटनेत अभिजीत दिपक सुखदरे (वय-२५) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिजित हा लॅाकडाऊन असल्यामुळे त्याच्या मित्रांसह मेन रोड भागातील साई सुपर मार्केट या कॉम्प्लेक्सच्या समोरील मोकळ्या पटांगणात क्रिकेट खेळत होता.
 
यावेळी पोलीस आल्याने हे तरुण तेथून पळून गेले. परंतू अभिजित हा साई सुपर मार्केटच्या गच्ची वर जाण्यासाठी जिन्याने वरती गेला आणि चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन तो कॉम्प्लेक्सच्या वरील पत्र्यातुन थेट खाली फरशीवर पडला.
 
हे लक्षात येताच आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला कॉल केला. अभिजीतला  ॲम्बुलन्समध्ये दाखल करत साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टर जगधने यांनी त्याला तपासले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.