1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (21:33 IST)

पोलिसांनी नियमबाह्य प्रश्न विचारले’; दरेकरांचे आरोप

pravin darekar
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर सध्या अडचणीत आलेले आहेत. मुंबै बँक निवडणुकीत  त्यांनी मजूर असल्याचे बोगस पुरावे दिल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवालं होतं. पोलिसांच्या नोटीशीनंतर दरेकर आज स्वत: पोलीससांसमोर गेले होते. रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानकात दरेकरांची तब्बल ४ तास चौकशी झाली. या चौकशीनंतर दरेंकरांनी पोलीस स्थानकाबाहेर येताच महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
 
मुंबै बँक निवडणुकीत प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून अर्ज भरून गेल्या अनेक दिवसांपासून निवडून येत आहेत. या प्रकरणी आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दरेकरांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार ते आज पोलिसांसमोर हजर झाले. पोलिसांनी दरेकरांची ४ तास चौकशी केली.
 
दरेकर यांनी सभासद म्हणून बँकेकडून काही लाभ घेतला का? याबद्दल त्यांनी पोलिसांकडून प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवणं अपेक्षित होतं. आमची भूमिका पोलिसांना कळली पाहिजे, त्यामुळे त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तेच तेच प्रश्न विचारून भंडावून सोडलं असं दरेकर म्हणाले. तसंच आपण सर्व प्रश्नांची उत्तर दिली. काही प्रश्न नियमबाह्य होते असा आरोप दरेकर यांनी केला.