रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (11:07 IST)

बस थेट घरात घुसली, आफरातफर माजली

Thane News ठाण्यात राज्य परिवहन मंडळाची बस थेट एका घरात घुसल्याची घटना घडली आहे. एका मद्यधुंद अवस्थेतील चालकाने बस थेट घरात घुसवली. कोपरी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
अचानक घरात बस घुसल्याने घरातील लोक बाहेर पळाले. तर लोकांनी बस चालकाला धरुन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या परिसरातील लोक चांगलेच हादरले.
 
बस चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित बस थेट घरातच घुसली. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र घराचे आणि जवळपास लगत असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
 
बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बस वाकडी-तिकडी धावू लागली. बसच्या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झालं. नंतर बस फुटपाथ पार करून थेट घरात घुसली. हा प्रकार बघून घरातील लोक तात्काळ बाहेरच्या बाजूला पळाले.
 
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.