शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:41 IST)

हाॅटेलमध्ये वेश्याव्यावसाय; माजी नगरसेवकाला अटक

arrest
अहमदनगर शहरातील 24 सप्टेंबर, 2021 ला  शहरातील महेश टॉकिज जवळील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यावसाय  सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता.

या प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी नगरसेवक संजय बाबुराव गाडे (वय 57 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) याला तोफखाना पोलिसांनी  अटक केली.त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. छाप्या दरम्यान पोलिसांनी देहविक्री करणार्‍या दोन महिलांची सुटका केली होती.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु सलीकचंद सौदे (वय 59 रा. गोविंदपुरा, यशवंत कॉलनी, अहमदनगर) व संजय बाबुराव गाडे यांच्याविरूध्द स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गाडे पसार होता. तो तारकपूर परिसरात येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलिसांंनी तारकपूर परिसरात सापळा रचून आरोपी गाडे याला ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.