अखेर पुण्यातील बालचित्रवाणी बंद
पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आणि 50 पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे.
बालचित्रवाणीऐवजी आता ई- बालभारती ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. याबाबत आधीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणी कायमची बंद होणार असल्याचे संकेत दिले होते.