1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Pune Hit And Run Case Vishal Agarwal father of minor boy remanded in police custody for 2 days

Pune Hit And Run Case : अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

jail
पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिली त्यात एक तरुण आणि एका तरुणीचा दुर्देवी अंत झाला या प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक केली. नंतर त्याला जामीन देण्यात आला. या घटनेपासून आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील पसार झाले असून त्यांना छत्रपती संभाजी नगर मधून अटक केले आहे. अल्पवयीन मुलाचे वडील पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे.  

या प्रकरणात लोकांमध्ये रोष आणि नाराजी असून विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना त्यांच्यावर वाटेत शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला असून  पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काहींना रोखले आणि ताब्यात घेतले.
 
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी पहाटे 'पोर्श' या आलिशान कारने दुचाकी स्वरांना उडवले त्यात अभियंता अनीस अहुदिया (24) आणि अभियंता अश्विनी कोस्टा (24) यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी पीडित दोघेही दुचाकीवरून मित्रांसोबत पार्टीवरून परतत होते. या अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा आहे. त्यालाही पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. पण अल्पवयीन असल्याने काही तासांतच बाल न्याय मंडळाने त्याला निबंध लिहिणे आणि वाहतूक नियम वाचणे अशा किरकोळ अटींवर जामीन मंजूर केला. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली.

Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
पतीशी वाद झाल्याने मुलीचा गळा आवळून आईनेच खून केला