शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रायगड , शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (22:33 IST)

भाजपला धक्का; सेनेतून भाजपात गेलेले ‘ते’10 नगरसेवक ठरले अपात्र

माथेरान मधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी काही दिवसांपुर्वी अंतर्गत वादातून भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या याच पक्षांतराच्या विरोधात माथेरान नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकारी रायगड याच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत दहाही भाजपवासी झालेल्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे.
 
माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी काही दिवसांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला होता. त्यांच्या याच पक्षांतराच्या विरोधात माथेरान नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकारी रायगड याच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती.
 
याबाबत रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. 27 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची अखेरची सुनावणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर याच्या समोर झाली. त्यानंतर निर्णय जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला होता. अखेर आज त्या नऊ नगरसेवकांसह एक स्वीकृत असे दहाही भाजपवासी झालेल्या नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे.तसा आदेश सर्व नगरसेवक यांना पोस्टाने कळविला आहे. भाजपात गेलेल्या या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
 
अपात्र ठरलेले नगरसेवक
आकाश कन्हैया चौधरी (उपनगराध्यक्ष) राकेश नरेंद्र चौधरी (आरोग्य सभापती) संदीप कदम नगरसेवक, सोनम दाभेकर (नगरसेविका) महिला बालकल्याण समिती सभापती, प्रतिभा घावरे नगरसेविका, रुपाली आरवाडे ( नगरसेविका) सुषमा जाधव नगरसेविका, प्रियांका कदम नगरसेविका, ज्योती सोनावळे नगरसेविका, चंद्रकांत जाधव स्वीकृत नगरसेवक. अशी त्या नगरसेवकांची नावे आहेत.