शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:44 IST)

राहुल गांधी 12 मार्चला नाशकात; श्री काळारामाची करणार आरती

काँग्रेस नेते राहुल गांधी दि. 12 मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून ते नाशिकमध्ये रोड शो देखील करणार आहेत.

नाशिक हे राजकारणाचा एक महत्त्वपूर्ण बिंदू बनत असून जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी रोडशो केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतल.  फेब्रुवारीच्या सुरुवातीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकचा दौरा करून पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये घेतले होते.
 
यावेळी त्यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन श्री काळारामाची आरती देखील केली होती. आता काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी हे दि. 12 मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांची यात्रा नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार आहे. त्यापूर्वी दि. 11 मार्च रोजी मालेगाव मार्गे चांदवडमध्ये राहुल गांधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांचा नाशिकमध्ये रोड शो होईल.
 
त्यानंतर ते काळाराम मंदिरात जातील या ठिकाणी काळारामाचे दर्शन घेऊन आरती करतील नंतर त्यांची यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे.
 
Edited by:  Ratnadeep Ranshoor