1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Rain Update Yellow alert issued with heavy rain in these districts

Rain Update :या जिल्ह्यांत मुसळधार पावसासह यलो अलर्ट जारी

सध्या राज्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे. मुंबई हवामान केंद्राने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी केला आहे.14ऑगस्ट रोजी, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राज्यातील काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.  राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच 95 जण जखमी झाले आहेत. पुण्यात ,औरंगाबाद,नाशिक, नागपूरात ढगाळ वातावरणाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. 
 
पुढील लेख
Traffic Challan Online: आता चलन भरण्यासाठी घाई करण्याची गरज नाही, घरी बसल्या या सोप्या पद्धतीने भरा