हृदयद्रावक: हरियाणातील पलवलमध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्या केली, पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहे
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. जिथे एकाच कुटुंबातील 5 लोकांनी आत्महत्या करून आपला जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि त्यांना शवविच्छेदनासाठी पलवल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.या घटनेनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. परिसरातील या घटनेमुळे लोक प्रचंड स्तब्ध झाले आहेत.
हे प्रकरण पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावाचे आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या जोडप्यामध्ये काही मुद्यावरून वादावादी झाली आणि नंतर त्याचे स्वरूप भांडण्यात बदलले, या नंतर रागाच्या भरात येऊन त्यांनी हे चुकीचे पाऊल उचलले.आज सकाळी या पाच जणांचे मृतदेह कुटुंबप्रमुखाला सापडले. त्यांनी या प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतांमध्ये पती -पत्नी आणि 3 मुलांचा समावेश आहे. मात्र, प्राथमिक तपासात पोलिसांना समजले आहे की, पती -पत्नीने गळफास लावून घेतला आहे आणि मुलांना विष देऊन मारण्यात आले आहे. याशिवाय पोलीस पुढील कारवाई करत आहेत.