शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:12 IST)

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, हत्यारे आणि स्फोटकांसहीत तीन जणांना अटक

पंजाबच्या तरनतारण येथे पोलिसांनी बुधवारी रात्री मोगा जिल्ह्याच्या सीमेवरील भिक्हीविंद परिसरात तपासणीदरम्यान तीन दहशतवाद्यांना अटक केली. याला दुजोरा देत फिरोजपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक जतिंदर सिंह औलख म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख कुलविंदर सिंह, कंवरपाल सिंह आणि कोमलप्रीत सिंह अशी आहे.
 
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 9 एमएम पिस्तूल, दारूगोळा आणि हातबॉम्ब जप्त केले आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांना न्यायालयात हजर केले जाईल आणि त्यांना चौकशीसाठी रिमांडवर घेतले जाईल, असे ते म्हणाले.
 
या महिन्यात पंजाबमध्ये आणखी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. अहवालांनुसार, या चार दहशतवाद्यांनी ऑगस्टमध्ये आयईडी टिफिन बॉम्बने तेलाचा टँकर उडवण्याचा कट रचला होता.