शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:08 IST)

शाळेचे छत कोसळले, तिसरीतील 27 मुले ढिगाऱ्याखाली, तीन मजूर जखमी

हरियाणाच्या सोनीपतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सोनीपत येथील गन्नौरमध्ये जीवनानंद पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी मोठा अपघात झाला. शाळेतील एका खोलीचे छत कोसळल्याने इयत्ता तिसरीतील 27 मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. त्याचवेळी, छतावर माती टाकण्याच्या कामात गुंतलेले 3 मजूरही भंगारात दबल्याने जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून सात मुलांना गंभीर स्थितीत पीजीआय रोहतक येथे रेफर करण्यात आले.
 
जीवनानंद पब्लिक स्कूलमधील तृतीय श्रेणीच्या खोलीच्या कच्च्या छतावर माती टाकली जात होती. या दरम्यान अचानक छप्पर कोसळून खाली पडले. यामुळे वर्गात शिकणारी 27 मुले आणि टेरेसवर काम करणारे तीन मजूर जखमी झाले. अपघातानंतर शाळेत चेंगराचेंगरी झाली.
 
जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे या सात मुलांना गंभीर स्थितीमुळे रेफर करण्यात आले. यामध्ये अंशु, लक्ष्मी, सूरज, कृती, भावना, दिव्या, सलोनी यांचा समावेश आहे. कुटुंबांनी मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 20 मुले आणि 3 मजुरांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. त्याचवेळी, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एसडीएम सुरेंद्र दुहान, सिव्हिल सर्जन जयकिशोर आणि बाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी देवेंद्र कुमारही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.