भारताच्या नीरज चौप्राला सुर्वणपदक, भालाफेकीत पटकावलं गोल्ड  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी, भालाफेकीत पटकावलं सुवर्णपदक
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारताच्या नीरज चोप्राने अत्यंत दिमाखदार कामगिरी करून भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं.
				  													
						
																							
									  
	 
	नीरज चोप्राने भालाफेकीच्या पहिल्या टप्प्यातील तीन फेकींमध्ये अनुक्रमे 87.03, 87.58 आणि 76.82 मीटर अंतरावर भाला फेकला.
				  				  
	 
	त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन फेकीमध्ये नीरज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याचा भाला 80 मीटरपेक्षाही कमी अंतरावर राहिला. शिवाय, नीरजने समोरील लाईन पार केल्याने त्या फेकी फाऊलही ठरल्या.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	पण, याचा नीरजच्या पदकावर काहीही परिणाम झाला नाही.
	 
	त्याने आपलं सुवर्णपदक दुसऱ्याच फेकीत निश्चित करून ठेवलं होतं. ते अंतर इतर कोणताच खेळाडू पार करू शकला नाही.
				  																								
											
									  
	 
	अखेर, नीरज चोप्राच्या 87.58 मीटर फेकीसाठी त्याला सुवर्णपदकाने गौरवण्यात आलं.
	 
				  																	
									  
	टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक आहे.
	 
	दरम्यान, नीरज चोप्राच्या सुवर्णपदकामुळे भारताची पदकसंख्या आज (8 ऑगस्ट) सातवर पोहोचली.
				  																	
									  
	 
	शिवाय आजच्या दिवशी भारताला मिळालेलं हे दुसरं पदक आहे. दुपारी झालेल्या कुस्तीच्या सामन्यात भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदकाची कमाई केली होती.